सोयगाव तालुक्यात विहिरी व गायगोठे कागदावरच,प्रशासनाकडून चौकशीचे आदेश! तालुक्यात खळबळ




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.३०-- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) सोयगाव तालुक्यात गायगोठे व विहिरींचे बोगस बिले काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याची मुख्यमंत्री व रोजगार हमी योजना मंत्री यांच्याकडे भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष शेख गुलाब यांनी ईमेल द्वारे केली होती.याची दखल घेत त्रिसदस्यीय समिती मार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान सोयगाव तालुक्यात रोजगार हमी योजने अंतर्गत अनेक कामे झालेले असून, गोरगरीब यांनी व्याजाने पैसे काढून काम पूर्ण केलेले आहे. तरी सुद्धा कर्मचारी बिल्ले व मस्टर काढीत नाही. तसेच सोयगाव तालुक्यामध्ये असे पण काही व्यक्ती आहे ज्यांनी काम न करता मस्टर भरून पैसे काढलेले आहे.कुठलेही काम नसतांना एम बी तयार करून बिल्ल काढलेले आहे.व सोयगाव तालुक्याची अशी अवस्था झालेली आहे कि रोजगार हमी योजने अंतर्गत आलेले अनेक गाय गोठे व विहीर हे चोरीला गेलेले आहे. अशा लोकाचे आपण एक वरिष्ठ लोकांची समिती निवडून त्याची तत्काळ चौकशी करण्यात यावी, व सोयगाव तालुक्यात रोजगार हमी अंतर्गत काढलेले मस्टर व विहिरीचे बिल, गाय गोठ्याचे काम न करता बिल काढलेले आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार आवक जावक मार्फत आलेल्या फाईल व आज काढलेली बिल याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने तत्काळ समिती गठीत चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गावर आंदोलन छेडण्यात येईल असे मुख्यमंत्री व रोजगार हमी मंत्री यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
 या प्रकरणाच्या सखोल चौकशी करण्यासाठी अशोक एन. दौड विस्तार अधिकारी (पंचायत), पं.स. सोयगाव, बडवणे कनिष्ठ अभियंता, पं.स. सोयगाव, रामेश्वर घोंगडे कृषी विस्तार अधिकारी, पं.स. सोयगाव यांची या त्रिसदस्यीय समितीत नियुक्ती करण्यात आली असून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments