लोणी प्रतिनिधी -- रूपाली भालेराव 
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवळखे खालसा येथील सुपुत्र कैलास पंढरीनाथ धनवडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. विविध चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या असून त्यांच्या अभिनयाची राज्यभर चर्चा होत आहे.
शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात कैलास भाऊ धनवडे यांना 'साई प्रेरणा गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला असून, या सन्मानामुळे त्यांच्या यशस्वी कलावाटचालीची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.
वास्तवदर्शी भूमिका आणि प्रभावी संवादफेक यामुळे त्यांना निर्माते, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळत आहे. सध्या त्यांच्या आणखी चार ते पाच चित्रपटांच्या प्रदर्शनाची तयारी सुरु असून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ग्रामीण भागातून चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कैलास भाऊ धनवडे यांच्या यशामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. कैलास भाऊ धनवडे यांनी प्रसिद्ध..
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' या मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या 'विठाई' या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. व तसेच 'RED FLAGS' हा चित्रपट मराठी, हिंदी, इंग्रजी मिक्स आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फिल्म अभिनेता 'उपेंद्र लिमये' सर यांच्या सोबत आहे. व बिग बॉस मराठी अभिनेत्री नेहा यांच्या सोबत दिसणार आहे. हवालदार या भूमिकेत याशिवाय त्यांनी मराठी व हिंदी चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकांमध्ये कॉन्स्टेबल, हवालदार आणि इन्स्पेक्टर अशा विविध दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयातील सहजता.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते कैलास भाऊ धनवडे यांच्याकडून आगामी काळातही दर्जेदार भूमिका पाहायला मिळतील, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
'साई प्रेरणा गौरव पुरस्कार' हा त्यांच्या कलाक्षेत्रातील समर्पण, मेहनत आणि सातत्यपूर्ण कार्याची मिळालेली गौरवपूर्ण पावती मानली जात आहे.
"ग्रामीण मातीतील संस्कार, सातत्यपूर्ण मेहनत आणि अभिनयातील वास्तवदर्शीपणा यांच्या जोरावर कैलास भाऊ धनवडे यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली आहे. त्यांचा हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे."
 प्रतिनिधी --- ( रूपाली भालेराव )
 सहसंपादक --- ( ज्ञानेश्वर साबळे )