दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान येथे श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या सभासदास नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत भाऊसाहेब मुंजाळ यांना 103840/- रूपयेचा धनादेश प्रदान करण्यात आला,
श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे, यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे.
संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे. याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी वार्षिक 2000 रुपये भरून नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो.या योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम संस्था करत असते. श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट टाकळीभान शाखेचे खातेदार सभासद भाऊसाहेब सूर्यभान मुंजाळ यांचे मागील काही दिवसांपूर्वी रस्ते अपघात झाला होता, त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत 1,500/- रुपये भरून नाव नोंदणी केलेली होती आज त्यांना 103840/- रुपये चा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने टाकळीभान शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्तकरण्यात आला,
या कार्यक्रम प्रसंगी कमलपूर गावचे मा. सरपंच सचिन मुरकुटे , सोसायटी चेअरमन दिगंबर बारस्कर , सोनार संघटनेचे अध्यक्ष मधुकर मैड,रमेश कोकणे ,कुणाल कोकणे , रवींद्र शिंदे ,भाऊसाहेब गोडे ,बाबासाहेब मुरकुटे ,राजेंद्र साप्ते ,कानिफनाथ जाधव ,सागर जेवरे, अक्षय खाडे ,अर्जुन दवंगे ,सागर कांगणे ,महेश कांगणे ,किरण वालतुरे, विलास मुंजाळ ,रायभान मुंजाळ ,संतोष मुंजाळ, गणेश मुंजाळ ,बंडू मुंजाळ ,सूर्यभान मुंजाळ व सर्व कमलपुर व परिसरातील ग्रामस्थ तसेच नागेबाबा संस्थेचे एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर श्री एकनाथ नांदे सर, शाखाधिकारी रविंद्र व्यवहारे , शुभम मुंढे, रामेश्वर काळे आणि शाखेतील सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
0 Comments