शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कोणतीही अट न ठेवता ताबडतोब करावी.. विठ्ठलराव शेळके

राहाता तालुका प्रतिनिधी 
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कोणतीही अट न ठेवता ताबडतोब करावी असी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पावसाळी आधीवेशनात 2019 ची जी अट होती ती काढली ते म्हणाले की अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती ही सर्वात मोठी कर्जमुक्ती असून राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना दोन लाखाची कर्जमुक्ती आम्ही करत आहोत पंरतू घोषणा करतात त्याची अंबलबजावणी होत नाही आज शेतकरी आर्थीक संघटात आहे खरीप पिके उभारण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंका कर्ज देत नाही यात दोन लाखाच्या पुढचे शेतकरी पैसे भरू शकत नाही निवडणुकीच्या वेळी सरसकट कर्जमुक्ती करून सात बारा कोरा करू असे तुम्ही जाहीर केले होते पंरतू सरकार कडे पैसे नाही म्हणता मग अशी योजना तयार करा की मुदंल कर्ज गेली दहा वर्षापासून थकले ते आज आठ ते दहा लाख झाले त्या मुळ कर्जाचे चाळीस टक्के सवलत देऊन ते दोन लाखात देऊन त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे म्हणजे जुन्या वंचीत शेतकऱ्यांना लाभ मिळेल मग मुख्यमंत्री म्हणाले प्रमाणे ही सर्वात मोठी कर्जमुक्ती असेल यात शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही सरकारचे अभिनंदन करू अन्यथा याप्रश्री सरकार विरोधात अंदोलन छेडू असा इशारा पत्रकात विठ्ठलराव शेळके यांनी सरकारला दिला आहे शिवाय म्हटले आहे की कुठलाही विलंब न लावता ताबडतोब कर्जमुक्ती ध्यावी आता तारीख नको सरकारकडे कर्जाची माहीती आहे वेळ नको कारण राज्यातील शेतकरी गेली सहा महिन्यापासून वाट पहात आहे.

Post a Comment

0 Comments