अवैध गौण खनिज प्रकरणाच्या चौकशीचे तहसीलदार यांच्या लेखी व कारवाईचे आश्वासनानेआमरण उपोषणार्थीची माघार ---




दिलीप शिंदे
छत्रपती संभाजीनगर दि.०५ अवैध गौणखनिजाच्या एकूण अठरा तक्रारी बाबत कारवाई करण्यात यावी यासाठी बुधवार पासून सुरू असलेल्या सोयगाव तहसील समोरील उपोषण दि.०४ गुरुवारी सायंकाळी चार वाजता तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्या लेखी आश्वासनाने माघार घेण्यात आले. 

संदिप इंगळे आणि दिलीप शिंदे या दोन सामाजीक कार्यकर्त्यांनी तालुक्यातील अवैध गौण खनिजाच्या वाहतुकीची तब्बल १८ तक्रारी महसूल कडे केलेल्या होत्या पंधरा महिन्यांचा कालावधी लोटला परंतु महसूल विभागाने या तक्रारीकडे दुर्लक्ष करून कारवाई केली नव्हती या तक्रारींची एस आय टी चौकशी व्हावी यासाठी संदीप इंगळे, दिलीप शिंदे यांनी बुधवार पासून सोयगाव तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले होते यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सायंकाळी चार वाजता नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषण ची माघार घेण्यात आली आहे दरम्यान यामध्ये प्रमुख तक्रारीत जरंडी येथील चिमणापूर धरणातून एका ठेकेदाराने प्लॉटींग साठी चारशे ब्रास विनापरवाना मुरुमाची वाहतूक केल्या ची तक्रार संदीप इंगळे यांनी (दि. २८) जानेवारी २०२५ केली होती यावरून संबंधिताच्या मालकीचे गटावर १९६६ च्या कलम १४९ व १५० नुसार बोजा नोंद करण्यात येईल असे लेखी आश्वासन नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांनी दिले त्यामुळे उपोषणाची माघार घेतली आहे. पंधरा दिवसात शासकीय व मालकी हक्कात जास्तीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान उपोषण स्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गजानन दांडगे, शांताराम सपकाळ, कुणाल जाधव, आकाश पुंडकर ,सोनवणे, विनायक जाधव आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments