सोयगाव दि.०५ - पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राज्यात पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना संस्थेच्या कार्यालयात गौरवण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभाग सिल्लोड चे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल पाटील यांनी सिल्लोड येथील सेवेच्या काळात लाखाहून अधिक रोपांची लागवड करून निसर्ग रक्षणाचे लक्षवेधी कार्य राज्यात केले आहे. राज्य पुष्प जारुळ - तामन च्या संवर्धन हेतू त्यांचे कार्य राज्यास मार्गदर्शक ठरले आहे. वन्यजीव संवर्धन, लष्कराच्या ग्रीन बटालीयन सोबत त्यांनी उत्कृष्ट कार्य करून , वन्यजीव रक्षण हेतू त्यांनी योगदान दिले आहे. राज्यस्तरीय निसर्ग संवर्धक पुरस्कार - २०२६ या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. ग्रामीण भागात पर्यावरण विषयक विषयांवर सातत्याने वार्तांकन,नदी स्वच्छतेच्या कार्यात व्यक्तिगत सहभाग, अवैध वृक्षतोड थांबविणे साठी लिखाण याबद्दल उल्लेखनीय कार्याचा स्व. पत्रकार राजेश भय्या चौबे यांच्या स्मृती खातर दिला जाणारा २०२६ सालचा राज्यस्तरीय अभिनव गौरव पर्यावरण स्नेही पत्रकार या पुरस्काराने पत्रकार योगेश पालोदकर यांना गौरवण्यात आले. स्मृती चिन्ह, सन्मान पत्र, मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरुप होते.सूर्यकिरण अर्बन को - क्रे.सोसायटी/बँक व अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पवार, पत्रकार सचिन चौबे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग चौधरी, नगरसेवक सुनील दुधे, आदर्श शिक्षक संजय बागुल,सूर्यकिरण बँकेचे सर व्यवस्थापक विजय चव्हाण , व्यवस्थापक दिपक पाटील,राजेंद्र चोपडे, प्रशांत गायकवाड, काकासाहेब वाढेकर, बाबुराव चव्हाण , कृष्णा महाजन, गोपाल गाढवे इत्यादींच्या हस्ते या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते आय यू सी एन च्या यादीत संकट ग्रस्त , दुर्मिळ व पावसाची देवता असलेल्या इंद्र देवाचा प्रिय वृक्ष असलेल्या वरुण या वृक्षाचे बीजारोपण करण्यात आले. वरुण हा मधमाशा, फुलपाखरे यांना अत्यंत उपयोगी असुन ही रोप नंतर विविध धार्मिक स्थळी लावण्यात येतील अशी माहिती डॉ. संतोष पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
0 Comments