दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील बाभळेश्वर रोडवर असलेल्या खंडाळा गावात राहणारे शेतकरी सचिन प्रभाकर ढोकचोळे,वय ५५ वर्षे यांचा खून त्यांचाच सख्खा मुलगा प्रणव सचिन ढोकचोळे,वय २५ याने डोक्यात कुदळ मारुन केला.यात सचिन ढोकचौळे यांचा मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोनि.नितिन देशमुख तातडीने घटनास्थळी पोहचले.पोलीसांनी आरोपी प्रणव ढोकचोळेला तातडीने तपास करत ताब्यात घेतले असून पंचनामा व गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
आरोपी प्रणवने वडिलांचा खून घरगुती कारणातून केला का ? अन्य काही कारण ? याचा पोलीस शोध करत आहे.मुलानेच बापाचा खून केल्याच्या घटनेमुळे खंडाळा गावासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.आरोपी मनोरूग्न असल्याची चर्चा गावात आहे परंतू त्याबद्दल खात्रीशीर सांगू शकत नाही,.
0 Comments