देशातील चारही मठांचे शंकराचार्य हे सनातन धर्माचे शास्त्रप्रमाण अधिष्ठान — संन्यासी आत्मारामगिरी महाराज




शिर्डी ( प्रतिनिधी)- सनातन धर्माची अखंड परंपरा, वेद-उपनिषदांचे अधिष्ठान आणि शास्त्रप्रमाण विचार यांचे जतन करणारे चारही मठांचे पूजनीय शंकराचार्य हे भारतीय अध्यात्मविश्वातील तेजस्वी दीपस्तंभ आहेत.

 त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि सनातन धर्मशास्त्रांचा गाभा प्रतिबिंबित होतो. असे मत श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे. श्री नर्मदेश्वर सेवा धाम यांच्या वतीने
“चारो मठ के शंकराचार्य बैठे हैं, अद्भुत विद्वान और शास्त्र के जानकार हैं” हा संदेश देणारे विशेष पोस्टर संन्यासी आत्माराम गिरी यांच्या हस्ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामधून सनातन धर्मातील शास्त्राधिष्ठित परंपरेचा गौरव करण्यात आला आहे.
या पोस्टरमध्ये चारही प्रमुख मठांच्या शंकराचार्यांचे दर्शन घडविण्यात आले असून ते धर्मसंरक्षण, सत्य, संस्कृती आणि शास्त्रप्रमाण विचारांचे प्रतीक म्हणून मांडण्यात आले आहेत. “शास्त्र प्रमाणित वाद बोलेंगे, लेकिन कितने समझनेवाले हैं?” या प्रभावी वाक्याद्वारे आजच्या समाजातील धर्मविषयक संभ्रम आणि अर्धवट ज्ञानावर भाष्य करण्यात आले आहे. 
यावेळीसंन्यासी आत्माराम गिरी यांनी म्हटले आहे की,
“सनातन धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नसून तो वेद, उपनिषद आणि शास्त्रांच्या आधारावर उभा असलेला दिव्य जीवनमार्ग आहे. चारही मठांचे शंकराचार्य हे त्या परंपरेचे जिवंत प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचन शास्त्राधिष्ठित आणि धर्मसंरक्षणासाठी प्रेरणादायी असते. सनातन धर्माच्या विरोधात किंवा शास्त्रांच्या विरोधात त्यांच्याकडून एक शब्दही आढळणार नाही.” असे म्हटले आहे.
या पोस्टरमध्ये पुढे “सनातन धर्म के विपरीत एक शब्द नहीं मिलेगा” आणि “शास्त्र के विपरीत एक शब्द नहीं मिलेगा” असे ठळक संदेश देण्यात आले असून सनातन धर्माची भूमिका त्यातून स्पष्ट करण्यात आली आहे.संन्यासी आत्माराम गिरी यांनी समाजातील युवक, भक्तगण आणि धर्मप्रेमींना आवाहन करताना सांगितले की, आजच्या काळात सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून अनेक अपप्रचार, अर्धवट माहिती आणि धर्मविरोधी विचार प्रसारित केले जात आहेत. अशा वेळी समाजाने मूळ शास्त्र, गुरु-परंपरा आणि शंकराचार्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
या पोस्टरच्या माध्यमातून चारही मठ, एकच ध्येय — “सनातन धर्माची रक्षा, शास्त्रांचा प्रमाण आणि धर्माचा सन्मान” हा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धार्मिक क्षेत्रात या पोस्टरची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून अनेक भक्त आणि धर्मप्रेमींनी त्याचे स्वागत केले असल्याचे संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments