या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सिन्नर ते सावळीविहीर फाटा दरम्यान ब्रंचचारी, शेतकी फार्म येथे पनवेलहून शिर्डी कडे येणारी एसटी बस व शिर्डी कडून सिन्नर कडे जाणारी एर्टिगा कार यांची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर कारचा समोरचा भागाचा चक्काचूर झाला. तसेच एसटी ही रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली.कार मधील विशाल काशिनाथ कांबळे व महेश काशिनाथ कांबळे या दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. मयत दोन्हीही भाऊ होते असेही समजते . तर दोन्ही वाहनांमधील 15 जण जखमी झाले असून त्यांना शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघात समजताच घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलीस तसेच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे साहेब हे स्वतः पोलीस पथकासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले.मदतकार्य ही तातडीने करण्यात येऊन जखमींना ताबडतोब श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या भागात काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. या वाहनांचा अपघात कशामुळे झाला. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments