सोयगावात दोन मे ला संघर्ष शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी भीक मांगो,धरणे व टक्कल आंदोलन ---

सोयगावात दोन मे ला संघर्ष शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी भीक मांगो,धरणे व टक्कल आंदोलन ---


दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०१ -- सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोयगाव तालुका संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने दि.०२ मे रोजी भीक मांगो,धरणे व टक्कल आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख यांच्या कडे संघर्ष शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल बिंदवाल यांनी दि.१८ एप्रिल रोजी दिले आहे. 

दरम्यान सोयगाव तालुक्यातील अनेक फॉर्मर आयडी धारक शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान प्राप्त झालेले नाही.तसेज यादीतील विसंगती बाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असून फॉर्मर आयडी नसलेले पण प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकरी अनुदान पासून वंचित राहिले असल्याने त्याबाबत अतिवृष्टी अनुदानाची अचूक ,पूर्ण व अद्यावत यादी नोटीस बोर्डावर व ऑनलाईन स्वरूपात प्रसिद्ध करावी, वितरणातील सर्व प्रशासकीय /तांत्रिक त्रुटींची त्वरित तपासणी करून दुरुस्ती करावी,अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची प्रत्यक्ष पडताळणी करून अनुदान वितरित करावे, फॉर्मर आयडी नसलेल्या पण नुकसानग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदानात समाविष्ट करावे असे तहसीलदार यांना संघर्ष शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल बिंदवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतीच्या मशागती दरम्यान शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आंदोलन करून देखील न्याय मिळणार की शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments