दिलीप शिंदे
सोयगाव दि.०१ -भारताचे पंतप्रधान नुकतेच इटली येथे गेले असता तेथे त्यांनी इटलीच्या पंत प्रधान जीओर्जी मेलोनी यांच्या समवेत मैत्रीचे व पर्यावरण रक्षणाचे प्रतीक म्हणून एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत "कृष्ण तुती" ( ब्लॅक मलबेरी )चे रोपण रोम शहरातील उद्यानात केले. त्यांनी भारतीयांनाही देशात याच्या रोपणाचे आवाहन केले व त्यास प्रतिसाद म्हणून सिल्लोड येथील वनस्पती अभ्यासक व संघांचे सह-कार्यवाह डॉ. संतोष पाटील यांच्या मदतीने कृष्णतुतीचे तसेच वारकरी संप्रदायात महत्व असलेल्या सुवर्ण पिंपळ, बेल,मोह इत्यादी ६ प्रजातीचे वृक्ष केऱ्हाळा येथील श्री.ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या आवारात लावण्यात आले.
प्राचीन काळी युरोपात रेशीम वाहतूक करणारा मार्ग हा सिल्क रूट होता व कालांतराने इरान तथा आखाती खाडीतुन जलवाहतूक सुरु झाली व सिल्क रूट मागे पडला. आखाती देशांची मनमानी व युद्ध जन्य परिस्थितीने हा सिल्क रूट जगास मोदींनी पुन्हा या एका झाडातून अवगत करून दिला. शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकडे जोड धंदा करणेस प्रेरित करणे हा संदेश ही यात आहे. दरम्यान अमृतचे जिल्हा उपव्यास्थापक योगेश रोडे, वारकरी संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. देविदास महाराज मिसाळ यांनी या रोपांचे पालकत्व स्वीकारले.या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जिल्हा व्यवस्थापक संदीप झालानी, कोकिळा माता मिसाळ, दादाराव एंडोले यांची उपस्थिती होती.
--- कृष्ण तुतीचे रहस्य व जगाला संदेश- प्राचीन काळी कुषान राजवटीत भारत व इटली सह युरोपचा व्यापारी संबंध होता. त्यास सिल्क रूट म्हणून ओळखले जाते . भारतातील रेशीम( सिल्क )युरोपात जायचे. रेशीमचा किडा हा या कृष्ण तुतीच्या झाडावर पाळला जातो.ही पाने तो रेशीम किडा खातो.थोडक्यात या झाडाचे प्राचीन नाते युरोप सोबत आहे. या वृक्षावर जेजेबल, निम्फा, कॉमन बेरॉन, मॉर्निंग क्लॉक, गौडी बेरॉन, रॉयल पिकॉक ई प्रजातीची फुलपाखरे अंडी घालून जीवनक्रम सुरु करतात.अनेक पक्षी ही फळं खातात असे डॉ. संतोष पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
0 Comments