निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे उपाध्यक्षपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ अनिल लोखंडे यांची निवड




 राजुरी (वार्ताहर ) विजय बोडखे 

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ही एक अग्रगण्य व नामांकित सेवाभावी सामाजिक संस्था असून ही संस्था ज्येष्ठ पर्यावरणवादी समाजसेवक पद्मभूषण डॉ आण्णासाहेब हजारे अर्थात श्री हजारे आण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली व वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे सरांच्या संकल्पनेतुन साकारलेली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था अध्यक्ष श्री प्रमोददादा मोरे व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून राज्यभर काम करीत आहे , या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत गेल्या अनेक वर्षांमध्ये समाजोपयोगी उपक्रम जसे की विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन ,सीडबॉल निर्मिती व बिजारोपण , विविध सामाजिक विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन , प्रदूषण नियंत्रण मंडळ व वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणारी जागृती व त्यामध्ये सक्रिय सहभाग ,नद्यानाल्यांची स्वछता, प्लास्टिक निर्मूलन, मुक्या पशु पक्ष्यांकरीता त्यांना जीवदान मिळण्यासाठी "मूठभर चारा व घोटभर पाणी" ही संकल्पना राज्यभर विविध संस्थांना मोफत मातीचे भांडी किंवा परळ वाटपाचे काम करून राबविली जाते. अशा संस्थेमध्ये राज्यभर अनेक पर्यावरण प्रेमी सदस्य पर्यावरण चळवळीत सहभागी होऊन वृक्ष संवर्धन व पर्जन्यमान अबाधीत राखण्यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा आयोजीत करून प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत

 . या संस्थेमध्ये माजी मुख्याध्यापक डॉ.अनिल लोखंडे सर गेल्या अनेक वर्षांपासून सदस्य , राज्य संघटक , सचिव ( कार्य व नियोजन) म्हणून विविध पदांवर कार्य करीत आहेत , आतापर्यंत झालेल्या संस्थेच्या प्रत्येक वार्षिक संमेलनात भूतान देशाचा पर्यावरण अभ्यास दौरा , शिर्डी ,चिपळूण, राळेगण सिद्धी, बारामती ,अकोले अशा अनेक ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी झालेले आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेवुन अध्यक्ष श्री प्रमो दादा मोरे यांनी डॉ अनिल लोखंडे यांची पुनःश्च एकदा सन -2026 ते 2029 तीन वर्षासाठी संस्थेच्या "उपाध्यक्ष पदी" निवड केली आहे. जागतिक पर्यावरण दिन ०५ जून व स्व आबासाहेब मोरे स्मृतिदिनाचे औचित्य साधत एक दिवशीय जनजागृती प्रबोधन व कार्यशाळा राळेगणं सिद्धी येथे आयोजीत कार्यक्रमात मान्यवर समाजसेवक आण्णा हजारे , अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया ,जिल्हा पोलीस अधीक्षक आर मुम्मका सुदर्शन, श्री चंद्रकांत शिंदे साहेब, वनाधिकारी अमोल जाधव , शिक्षणाधिकारी माध्य. संध्या गायकवाड , सरकारी वकील सुरेश लगड यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व नियुक्ती पत्र वितरण व सपत्निक सौं आशाताई व अनिल लोखंडे सर यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान संस्थेमामर्फत केला जाणार आहे. या निवडीबद्दल त्यांचे मंडळातील सर्व सदस्य , पं स राहुरी मा उपसभापती प्रा दिगंबर पा शिरसाठ, दीपक पा शिरसाठ, रामपूर सरपंच राहुल पा साबळे, सोपानराव शिरसाठ, प्रकाश पा ताठे, ह भ प आण्णासाहेब महाराज लोंढे , कोल्हार भगवतीपूर मा सरपंच रावसाहेब पा खर्डे, ह भ प शीतल महाराज साबळे, मा चेअरमन प्रकाश पा साबळे ,शेतीतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पा लोखंडे, ज्ञानदेव पा सरोदे ,अरुण पा नालकर ,रावसाहेब पठारे ,सीताराम पठारे ,बाजीराव पा डोखे , रवींद्र साबळे , पत्रकार विजय बोडखे,पत्रकार कोंडीराम नेहे,छायाचित्रकार दिलीपराव धावणे, ज्ञानदेव मोरे , दत्तात्रय नालकर, किशोर पठारे, माजी सैनिक ताराचंद गागरे, बाळासाहेब पा मुसमाडे अशा अनेक पर्यावरण प्रेमींनी अभिनंदन करून कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments