लोहगाव (वार्ताहार) : डॉ. शरद दुधाट यांच्या 'श्रमसाफल्य' या आत्मकथनाचे प्रकाशन, रविवार दि. ७ जून २०२६ रोजी आनंदवन येथे महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या शुभहस्ते होत आहे.
डॉ. शरद दुधाट हे प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आनंदवन येथे आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्यासाठी विश्व लक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
तर डॉ. सौ.भारतीताई आमटे, उमेशजी ठाकूर, प्रा.आदिनाथ जोशी, सुधाकर कडू गुरुजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. दुधाट यांचे श्रमसाफल्य या आत्मकथन बालपण, शिक्षकी ध्येयाचा जीवनप्रवासासह महाविद्यालयीन संस्कारांची जडणघडण, सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरातील संस्कार आणि बाबा आमटे, साधनाताई आमटे, शेगाव संस्थानाचे अध्यक्ष शिवशंकर पाटील, तुकारामदादा गीताचार्य, ॲड.रावसाहेब शिंदे, शशिकलाताई शिंदे, यांच्या सहवास आणि संस्कारशील पर्वाचा लेखाजोखा मांडला आहे.
या आत्मकथनास डॉ. विकास आमटे यांनी प्रस्तावना दिली असून श्रमाधिष्ठित मूल्यसंस्कारांची शिकवण आणि त्यांचा आदर्श सेवाभाव या पुस्तकातून व्यक्त झाला आहे.
0 Comments