राहाता तालुक्यातील शिर्डी जवळील सावळीविहीर बुद्रुक येथील मूळचे रहिवासी व सध्या नाशिक येथे स्थायिक असलेले रवींद्र यादवराव पाचोरे हे आपल्या सुमारे 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक या कंपनीमधून आज सोमवार एक जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले असून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मध्ये सत्कार करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील अधिकारी व कर्मचारी मित्रपरिवार, व पाचोरे परिवार उपस्थित होता.
रवींद्र यादवराव पाचोरे हे शिर्डी येथून साई संस्थांनच्या आयटीआय मध्ये मोटर मेकॅनिकल आयटीआय पूर्ण केल्यानंतर ते नाशिक येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मध्ये नोकरीला लागले. सुमारे 1991 ला ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत नोकरी लागले सन 1996 ला ते या कंपनीत परमनंट झाले झाले . सुमारे 35 वर्ष त्यांनी येथे प्रामाणिक व इमानदारीने सेवा केली. आज एक जून 2026 रोजी ते या प्रदीर्घ सेवेनंतर या महिंद्रा अँड महिंद्रा प्रसिद्ध अशा कंपनीतून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने कंपनीचे अधिकारी तसेच कंपनीचे कर्मचारी मित्र परिवार यांच्या वतीने महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी मध्ये सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी पत्नी सौ अलका रवींद्र पाचोरे, तसेच चिरंजीव उर्वेश रवींद्र पाचोरे, मुलगी स्नेहल स्वप्निल दुशिंग , असा पाचोरे परिवार उपस्थित होता. यावेळी कंपनीचे अधिकारी यांनी रवींद्र पाचोरे यांना सेवानिवृत्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे, उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे जावो अशा सदिच्छा दिल्या. यावेळी रवींद्र पाचोरे यांनी सर्वांचे धन्यवाद मानत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मध्ये काम करत असताना कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मित्र यांनी मोठे प्रेम दिले. अनेकदा सांभाळून घेतले.त्याबद्दलही त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कंपनीचे अधिकारी ,कर्मचारी व पाचोरे परिवार उपस्थित होता.
0 Comments