पत्रकार कोंडीराम नेहे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! अनेकांनी दिल्या शुभेच्छा! शुभेच्छा व अभिष्टचिंतन करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार -पत्रकार कोंडीराम नेहे

शिर्डी( राजकुमार गडकरी)
सत्तेचा महासंग्राम ऑनलाईन न्यूज, सत्तेचा महासंग्राम न्यूज चैनल व दैनिकाचे संस्थापक संपादक पत्रकार कोंडीराम नेहे पाटील यांचा वाढदिवस एक जूनला मोठ्या उत्साहात साजरा झाला. 
  कोंडीराम नेहे पाटील हे राहाता तालुक्यातील प्रवरा कारखाना जवळील लोहगाव येथील मूळचे रहिवाशी असून सुमारे 30 ते 40 वर्षापासून ते पत्रकारीतेच्या क्षेत्रात आहे. दैनिक प्रभात, दैनिक सार्वमत, गावकरी, पुण्यनगरी.सामना. आदींसह विविध वृत्तपत्रात त्यांनी पत्रकार म्हणून यापूर्वीही काम केले आहे. सध्या दैनिक सार्वमतचेही ते लोहगाव येथील पत्रकार आहेत. तसेच त्यांनी सत्तेचा महासंग्राम न्यूज हा पोर्टल न्यूज चॅनल, ऑनलाइन न्यूज, दैनिक सत्तेचा महासंग्राम वृत्तपत्र सुरू केले असून ते संस्थापक संपादक आहेत. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून तळागाळातील समाजाचे प्रश्न समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून सोडवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. असे शांत, मनमिळावू ,स्वभावाचे व स्वाभिमानी, स्पष्टपणे मत मांडणारे व निर्भीड असे पत्रकार कोंडीराम नेहे यांचा एक जून रोजी वाढदिवस असल्याने सकाळपासूनच त्यांना विविध क्षेत्रातून व पत्रकारांच्या वतीने प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियावर व भ्रमणध्वनी द्वारे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करण्यात येत होते. प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष पत्रकार विजय बोडखे, ज्येष्ठ सदस्य प्रकाश औताडे पाटील व इतर पत्रकारांच्या वतीने कोंडीराम नेहे यांचा वाढदिवसानिमित्त घरी जाऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय नेहे पाटील, व नेहे परिवार उपस्थित होता.यावेळी प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने त्यांना पुढील आयुष्यासाठी व पत्रकारितेत आणखी यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.या सत्कारानंतर पत्रकार कोंडीराम नेहे यांनी वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे व प्रवरा प्रेस क्लबचे यावेळी आभार मानले.

Post a Comment

0 Comments