खोकर ते वडाळा महादेव मध्यवर्ती रस्त्यामध्ये पडलेल्या झाडांमुळे अनेक अपघात...

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यातील खोकर ते वडाळा महादेव परिसरामध्ये वादळ होऊन 24 तास होऊन गेले तरी राज्य मार्ग क्र. 44 खोकर ते वडाळा महादेव रोडवर मध्यवर्ती पडलेले झाडे अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याने काढले नाही रात्रीच्या प्रसंगी रस्त्यावर पडलेल्या झाडांचा अंदाज न आल्याने त्यामुळे अपघात झाले आहे. 

याला कारणीभूत सार्वजनिक बांधकाम खाते हलगर्जीपणा करत असून वाहनांची मोठ्या रहदारी व वर्दळीच्या या रस्त्यावर अजून किती बळी जाणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित रस्त्यावर पडलेली झाडे काढावीत व पुढील होणारे अपघात वाचवावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments