दिलीप शिंदे
सोयगाव दि.०५-- खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर व सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी तालुका कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या "खतांचे आगाऊ बुकिंग" उपक्रमाच्या जनजागृतीसाठी दि.०५ शुक्रवार पासून तालुक्यात शेतकरी बैठक आयोजित करण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार पडताळणी, पीक व खत निवड, खत विक्रेता निवड तसेच QR कोड/टोकनच्या माध्यमातून खत प्राप्त करण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर समजावून सांगण्यात आली. तसेच आगाऊ बुकिंग केल्यास खतांची उपलब्धता निश्चित होऊन गर्दी व गैरसोय टाळता येते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे नोंदणी व आगाऊ बुकिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.शुक्रवार पासून तालुक्यातील गावागावात कृषी विभागाच्या पथकाने शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले दरम्यान पहिल्याच दिवशी तालुक्यात केवळ १०० शेतकऱ्यांचे हे प्रात्यक्षिक यशस्वी झाले असून पहिल्याच ऍप्स मध्ये तांत्रिक अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते दरम्यान शुक्रवारी ऍप्स मध्ये यशस्वी झालेल्या शंभर शेतकऱ्यांना शनिवारी तालुक्यातील विविध ठिकाणी खते मिळणार आहे कृषी विभागाच्या या उपक्रमास शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आगाऊ खत बुकिंग प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी यावेळी केले.
0 Comments