टाकळीभान प्रतिनिधी-- महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसेच दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे अखिल लोहार गाडी लोहार विकास संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, लोह क्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळ संस्थेच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांपैकी एका स्वीकृत सदस्यपदासाठी लोहार समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी वेळोवेळी वारंवार निवेदने, पत्रव्यवहार तसेच सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला.
मात्र इतका पाठपुरावा करूनही लोहार समाजाच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे समाजाच्या मागणीपत्राला जणू केराची टोपली दाखविण्यात आल्याची भावना संपूर्ण लोहार समाजामध्ये निर्माण झाली आहे.
राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोहार समाजाला राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्व समाजघटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असताना लोहार समाजावर वारंवार अन्याय होत असल्याची तीव्र भावना लोहार समाज बांधवांमध्ये आहे.
लोहार समाजाच्या भावना आणि मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात येत आहे. आगामी काळात लोहार समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने व्यापक लढा उभारेल. अशी माहिती लोह क्रांती एक विचारधारा सामाजिक चळवळ.
अध्यक्ष श्री संजय कोलंबकर ,
अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य पुणे
अध्यक्ष श्री कुमारभाऊ थोरात
कार्यवाह श्री दिलीप वसव लोहार यांनी दिली आहे,
चौकट -" प्रतिनिधित्व हा आमचा घटनात्मक अधिकार आहे; उपेक्षा आता सहन केली जाणार नाही!"
0 Comments