वैजापूर (तालुका प्रतिनिधी)
कु. पूर्वा शितोळे हिचे जीवनमान म्हणजे यशाची शिखरे गाठताना संस्काराच्या शिदोरीची गरज असते असे नव युवक युवतींना प्रेरणा देणारे..हभप श्री संजयजी महाराज दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला म्हणजेच आपल्या ग्रामीण भाषेत धोंड्याच्या महिन्याला विशेष असे महत्त्व असते. या महिन्यात फक्त जावई जेवू घालावे एवढेच नव्हे तर या महिन्यात विविध देवदर्शन, गंगास्नान,भजन, किर्तन व संत भोजन यासारख्या धार्मिक कार्याला विशेष महत्त्व असते
अशाच प्रकारे वारकरी संप्रदायासाठी वाहून घेतलेले असे गायनाचार्य श्री रविभाऊ शितोळे यांनी काल रविवार दि सात ०७.६ २०२६ रोजी आपल्या 'राम कृष्ण हरी' या निवासस्थानी अधिकमासाच्या पर्वावर 'संत स्हेहभोजन' कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी ह भ प श्री संजय जी महाराज जगताप, ह भ प श्री स्वरूपानंद गिरी महाराज, उत्तराधिकारी श्री आदिमाया मुक्ताई आश्रम श्रीक्षेत्र पुणतांबा, ह भ प श्री भरतजी महाराज, श्रीक्षेत्र डवाळा आश्रम व व आदी साधुसंत, नातेवाईक व मित्र वर्गाच्या उपस्थितीत भक्ती व आनंदमय वातावरणात संत स्नेह भोजनाच्या कार्यक्रमानंतर श्री रविभाऊ शितोळे यांची कन्या कु. पूर्वा शितोळे हिने HSC बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्टपणे संपादन केल्याबद्दल ह भ प श्री संजय जी महाराज, ह भ प श्री स्वरूपानंदगिरी महाराज यांच्या हस्ते तिला शॉल व बुके देऊन तिला सन्मानित करण्यात आले.
ह भ प श्री संजय जी महाराज यांनी कु. पूर्वा शितोळे हिचा परिचय करून देताना सांगितले की, कु. पूर्वा शितोळे हिचे संस्कार तिचे पिता गायनाचार्य श्री रविभाऊ शितोळे यांची मान उंचावणारे आहे असे सांगून त्यांनी सांगितले की तिने कॉलेजला शिक्षण घेत असताना तिने परिवाराला असलेला वारकरी संप्रदायाचा पगडा व त्यांचे संस्कार कॉलेजच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून वेळोवेळी सिद्ध केलेला आहे. त्यातूनच कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आकर्षक ठरलेल्या अशा राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांची भूमिका ही आकर्षक अशी ठरली आणि त्यातूनच अनेकांना राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही त्याचबरोबर कॉलेजच्या विविध वक्तृत्वात असलेले तिचे नेतृत्व हे नेहमीच प्रेरणादायी असेच होते असे स्वतः संजीवनीच्या संचालिका सौ निकिता (दीदी) सुमित कोल्हे यांनी मला सांगितल्याचे हभप श्री संजयजी महाराज यांनी सांगितले...
हभप श्री स्वरुपानंदगीरी महाराज यांनी म्हटले की,बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याप्रमाणे आदर्श असा असलेला श्री रविभाऊ शितोळे यांचा परिवाराचे कौतुक करत कु पुर्वा हिने रेखाटलेली रांगोळीतून भगवान श्री पांडुरंग व त्यावर संत चरण लागता सहज या लिहिलेल्या प्रमाणातून वारकरी संप्रदायाचा पगडा व त्यातून तिच्यावर असलेले संस्कारच ह सिद्ध होतात असे त्यांनी सांगितले
संजीवनी जुनियर कॉलेज येथे कार्यरत असलेले श्री अविनाश गोपीनाथ जगताप यांनी सांगितले की मुळात माझी व रविभाऊ शितोळे यांची ओळखच हभप श्री संजय जी महाराज यांनी करून दिली होती व त्यातच त्यांनी त्यांची कन्या कु. पूर्वा हिचा अकरावी बारावीसाठी प्रवेश हा संजीवनी कॉलेजला घेतला आणि तिच्या आदर, आपुलकी यांसारख्या सद्गगुणामुळे आमचे शितोळे परिवाराशी एक पारिवारिक ऋणानुबंध तयार झाले आणि तिचा ११वीमध्ये प्रवेश घेतल्यापासून घरी येण्याचा आग्रह होता. मागेही त्यांच्या वस्तीवर हभप श्री उद्धवजी महाराज मंडलीक व हभप यांना संत भोजनाच्या कार्यक्रमाला आग्रहाचे निमंत्रण असतानाही येणे शक्य नाही झाले तरीही या कार्यक्रमालाही तिने आग्रहाचे दिलेले आमंत्रण म्हणजे तिच्यावर असलेल्या संस्काराची श्रीमंती दिसून येते. आणि अशा या आज अधिक मासाच्या आजच्या संत भोजन पंगतीत भोजनाचा व संत दर्शनाचा योग येणे म्हणजे हे आमचं परमभाग्याच असल्याचे श्री अविनाश जगताप यांनी सांगितले
सन्माननीत कु.पुर्वा शितोळे हिने सांगितले की आज साधूसंताच्या हस्ते झालेला माझा सन्मान म्हणजे शब्दाच्या वर्णनाच्या पलीकडे पलीकडे असून मी आज मिळाल्या साधुसंतांच्या आशीर्वादाने पुढील शैक्षणिक गरुड झेप निश्चित काबीज करेल असे सांगून आज मिळालेली संजीवनीची लोगोची शाल मला त्यासाठी निश्चित प्रेरणा देईल असे तिने सांगितले. व यावरून संजीवनी बद्दल तिचा असलेला आदर व आत्मीयता दिसून येते.
0 Comments