दिलीप शिंदे
सोयगाव दि.०८-तालुक्यातील बनोटी येथे गावाच्या जवळ टेकडीच्या खाली गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना स्वतः चे फायदे साठी विक्री करतांना दि.०७ रविवारी रात्री आठ वाजता एकास रंगेहाथ पकडले याप्रकरणी संदीप सुसर यांनी रात्री नऊ वाजता दिलेल्या फिर्यादी वरून एका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बनोटी गावाच्या जवळ टेकडीच्या खाली-उमेश रामदास भिल्ल वय ६५ वर्षे रा. बनोटी हा विनापरवाना गावठी हातभट्टी ची दारू विक्री करत असल्याचे सोयगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यास रंगेहाथ पकडले त्याचे कडून प्लास्टीक पन्नीचे ३५ पाऊच ज्यामध्ये गावठी हातभट्टीची आबंट व उग्रट वास येत असलेली दारु एकूण किंमत१,७५० रु दुसऱ्या एका प्लास्टीकच्या बरणीमध्ये मध्ये अंदाजे ४ लिटर आंबट व उगरट वास येत असलेले गावठी हातभट्टीची दारू असा एकुण-२,७५० रुपये मुद्देमाल हस्तगत केला पोलिस निरीक्षक दिनकर गोरे,उपनिरीक्षक गजानन आरेकर, संदीप सुसर,नारायण खोडे,गजानन दांडगे,अजय कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
0 Comments