दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९-- सोयगाव तालुक्यात रात्री बेरात्री सर्रासपणे सुरू असलेल्या चोरटी वाळू,मुरुम व माती वाहतुक करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्या आदेशाने भरारी पथकात नियुक्त्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.आठ दिवसांचा कालावधी लोटला असून भरारी पथकाकडून एकही कारवाई करण्यात आलेली नाही.
भरारी पथकात नियुक्त्या करण्यात आलेली कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नसल्याने चोरटी गौण खनिज वाहतुकीवर कारवाई बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सोयगाव तालुक्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यात रात्री बेरात्री वाळू,मुरुम, माती ची चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरू असून महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीमुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तहसीलदार यांच्या आदेशाने माहे जून महिन्या करिता सायंकाळी ०७:०० ते सकाळी ०७:०० या कालावधीत चोरटी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहन व माफियांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकात वार निहाय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.यात सोमवार - पथक प्रमुख सोयगाव मंडळ अधिकारी कल्पना डीघोळे,ग्राम महसूल अधिकारी शंकर देवतुळे,महेंद्र वाडकर,महसूल सेवक संजय नावकर, मंगळवार पथक प्रमुख जरंडी मंडळ अधिकारी अरुण पंडित,ग्राम महसूल अधिकारी आर. चव्हाण, एस. एस.राऊत, जरंडी महसूल सेवक मनोज आगे, बुधवार पथक प्रमुख बनोटी मंडळ अधिकारी एल. आर. जाधव, ग्राम महसूल अधिकारी विशाल महाशब्दे,गणेश ठोंबरे, घोसला महसूल सेवक समाधान गोराडे, गुरुवार - पथक प्रमुख ग्राम महसूल अधिकारी गणेश ठोंबरे , माधव चव्हाण, बनोटी महसूल सेवक प्रवीण संसारे, वडगाव ति.महसूल सेवक सुदाम ठाकूर, महसूल सहाय्यक शरद पाटील, शुक्रवार - पथक प्रमुख सोयगाव मंडळ अधिकारी कल्पना डीघोळे, फर्दापूर ग्राम महसूल अधिकारी वैभव जाधव, धनवट ग्राम महसूल अधिकारी क्षितिज निंबाळकर, पळसखेडा महसूल सेवक शिवाजी शेरे,फर्दापूर महसूल सेवक संजय नावकर, शनिवार - पथक प्रमुख नांदतांडा ग्राम महसूल अधिकारी आकाश पिराने, सावळदबारा ग्राम महसूल अधिकारी टी. एम. नागपुरे,मोलखेडा महसूल सेवक संजय साठे,फर्दापूर महसूल सेवक संजय नावकर, रविवार - पथक प्रमुख बनोटी मंडळ अधिकारी एल. आर.जाधव,सावळदबारा ग्राम महसूल अधिकारी टी.एम. नागपुरे, सावल्डबारा महसूल सेवक शंकर काळे, तिडका महसूल सेवक गजानन जाधव यांचा समावेश आहे.
भरारी पथकात नियुक्त कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नसल्याने रात्री बेरात्री गौण खनिजांची चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकप्रमुख यांना देण्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता मोबाईल बंद करून ठेवत असल्याने कारवाई होत नाही.भरारी पथकातील कर्मचाऱ्यांचे गौण खनिज माफियांशी आर्थिक हितसंबंध तर नाहीना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. चोरट्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यावर कारवाई होईल की जून महिना निरंक जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments