शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबा महाविद्यालयात ८ व्या राष्ट्रीय केटलबेल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप दिनांक ४ जून ते ७ जून २०२६ दरम्यान संपन्न होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक ४ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री साईबाबा सांस्कृतिक भवन येथे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर व राष्ट्रीय केटलबेल स्पोर्ट्स इंडिया असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू तारावत यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
श्रीमती तारावत यांनी उपस्थित स्पर्धक खेळाडूंना मार्गदर्शन केले. तर श्री गाडीलकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले व अतुल वाघ उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे यांनी केले.
ह्या स्पर्धेसाठी तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, राजस्थान, तेलंगणा, आसाम व उत्तर प्रदेश अशा तेरा राज्यांतून १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने कॅटलबेल स्पोर्ट्स इंडिया असोसिएशनचे पदाधिकारी अरुण कुमार, मनीष कुमार रोहेल, शालिनी सिंग, सरबजीत सिंग दिलावरी, सुषमा बाजवा, कॅप्टन वंदिता वर्मा यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र कोहोकडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व कार्यलयीन कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments