या ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच ओमेश जपे हे होते. त्यासाठी शांताराम जपे यांनी सूचना मांडली व किरण आगलावे यांनी अनुमोदन दिले. प्रथम ग्रामसेवक कार्ले साहेब यांनी पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच घरगुती व सार्वजनिक स्तरावर ओला, सुका कचरा वेगळा करून प्लास्टिकचा वापर पूर्ण बंद करण्यासंदर्भात व घन आणि प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करत सार्वजनिक ठिकाणी व स्थानिक जलस्रोत म्हणजे विहिरी, बारव, साठवून बंधारे, चर,नाले स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले.
या सभेत गणेश कापसे यांनी सांडपाण्याचा प्रश्न उपस्थित करताच येथे सांडपाणी व्यवस्थापनासाठी सुमारे 45 लाखाची इस्टिमेट असून त्यापैकी ठेकेदाराला पंधरा लाख रुपये दिले आहेत. कामासाठी मुदतवाढही दिली आहे .मात्र ते अजून पूर्ण झाले नाही पाठपुरावा करून ते पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे सांडपाण्याचा बराचसा त्रास कमी होईल असे यावेळी सांगितले.या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी विविध प्रश्न समस्या मांडल्या. यावेळी सोमनाथ आगलावे व विक्रम आगलावे यांनी कारवाडीला साठवण बंधाऱ्यात पाणी जाणाऱ्या चारीत परिसरातील इमारतींचे सांडपाणी व कचरा सोडला जातो. ते बंद करण्याची मागणी केली असता सरपंच ओमेश जपे यांनी संबंधित इमारती मालकांना व रहिवाशांना ग्रामपंचायतीतर्फे नोटीस देऊन स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यासंदर्भात सूचना करण्यात येईल व या चारीत कचरा टाकू नका , ओला सुका कचरा घंटागाडीत टाकण्याचे सुचवले जाईल.
असे सांगितले तर गणेश कापसे यांनी येथील बारवाचा गाळ काढून खोली वाढवावी. अशी सूचना मांडत ज्या अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन त्यांची घरी पाडली आहेत. त्यांना जागा दिल्या त्याबद्दल आमची तक्रार नाही. मात्र त्यातीलच काही जे राहिले त्यांना पण जागा द्या .अशी यावेळी मागणी केली. तसेच मंजूर घरकुलांपैकी दोनच घरकुले येथे चालू असल्याचे समजते, बाकी मंजूर घरकुलांचे काय? असाही प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.तर किरण आगलावे व बाळू काशीद यांनीही जे खरे पात्र व गरजेवंत आणि येथील रहिवाशी आहेत त्यांनाच जागा द्या. विनाकारण कोणालाही जागा देऊ नका. असे म्हटले. त्यावर सरपंच जपे यांनी जो पात्र व रहिवाशी आहे त्यांनाच जागा दिलेल्या आहेत. जो रहिवाशी नाही मात्र त्यांना जागा दिल्या गेले असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. असे सांगत जागा दिलेल्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत शोकेसमध्ये लावली जाईल.व ज्यांना नोटीस दिली त्यांनाच जागा दिली जाईल. त्याच्या कुटुंबातील इतरांना जागा मिळणार नाही. जो खरा गरजवंत, गोरगरीब आहे त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. असे सांगितले. सतीश वाघमारे यांनी येथील बुद्ध विहार मध्ये शौचालय,बाथरूम व इतर केलेल्या मागण्यासंदर्भात सरपंच जपे यांनी सांगितले की, येथील बुद्ध विहार मध्ये दोन खोल्या बाथरूम शौचालय सह बांधण्यात येतील तसेच लवकरच नव्या संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिले जाईल व येथील एमआयडीसीमध्ये गावातील मुलांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या नावाने अर्ज करून ग्रामपंचायतचे शिफारस जोडून अर्ज तेथे द्यायचा आहे.ना. विखे पाटील यांनी येथील प्रत्येक घरातील एका माणसाला काम देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र ते टप्प्याटप्प्याने होईल .असे सांगितले. तर रमेश कसबे यांनी सोमैय्या नगर मधील प्रश्न मांडले. त्यावर सरपंच यांनी येथे सार्वजनिक शौचालय सुरू करून पावसाळ्यापूर्वी मुरूम टाकण्यात येईल असे आश्वासन दिले तर गणेश आगलावे व सागर आरणे यांनी गावातून इतर गावात मुरमाचे डंपर जातात. आतापर्यंत सुमारे 1000 डंपर मुरूम बाहेरगावी गेला आहे.मात्र गावात मुरूम टाकला जात नाही. परगावी मुरूम जात असेल तर सर्वांना बरोबर घेऊन त्या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी बोलले पाहिजे. अशी सूचना मांडताच सरपंच जपे यांनी मुरूम सुरू असताना तेथे जाऊन आपण तक्रार केली. विरोध केला. पहिल्याच दिवशी पंचनामा केला.ग्रामपंचायतीने कोणत्याही परवानगी त्यासाठी दिलेली नाही. मात्र वरिष्ठ नेत्यांनीच सांगितल्यामुळे काही करता येत नाही. तरीही गावात 50 डंपर मुरूम टाकण्यात यावे अशी आपण मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुरेश वाघमारे यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर माजी सरपंच अशोकराव आगलावे पा. यांनी गावातील मुरूम बाहेरगावी जाऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. वरिष्ठ नेत्यांनाही तसे सांगितले पाहिजे.गावचे गाव पण टिकवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी स्वतःची जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे . असे सांगत गावात स्वच्छता, पिण्याचे पाण्याचे नमुने याकडे लक्ष दिले पाहिजे. येथील दवाखान्यातील अधिकारी, कर्मचारी
कामचुकारपणा करतात त्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.व पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करण्याची गरज व्यक्त केली असता मागील वर्षी देवीजवळ व गावातील चराच्या कडेला अनेक नारळ व इतर झाडे लावले मात्र अनेकांनी ती उपटून टाकली. ठेकेदाराकडून देणगी म्हणून सुमारे दीड ते दोन लाखाची झाडे लावली होती. मात्र ती आली नाही. यापुढेही जो कोणी वृक्षरोपण करून झाडांचा सांभाळ करील त्यास चार ते पाच फळांचे रोपे वृक्षरोपणासाठी दिली जातील असे सांगत येथील गुरुवारच्या आठवडे बाजारात पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यात येईल. असे यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी सांगितले.या विशेष ग्रामसभेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, उपसरपंच विकास जपे, माजी सरपंच सोपानराव पवार, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनसोडे, दिलीप गायकवाड,संजय जपे, किरण जपे, सुनील जपे, आनंद जपे, संतोष गायकवाड, सुनील आगलावे, डांगरे, सुधीर कामठे, पप्पू आगलावे, राजू कापसे, कैलास पळसे ,बाळू जपे, शिवाजी आगलावे ,रावसाहेब एखंडे, विनायक वाघमारे ,मारुती कापसे, गौतम गोडगे, दिनेश आरणे, सनी वाघमारे, शतंनू वाघमारे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा, ग्रामस्थ, युवक, महिला यावेळी उपस्थित होते.
0 Comments