आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२१-- संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिरीष पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योग हा शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक शांतता व एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.

 योग प्रशिक्षक डॉ.प्रा. निलेश गाडेकर व प्रा.विनोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम व ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून घेतले.या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, कार्यालयीन अधीक्षक पंकज साबळे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनील चौधरे यांनी केले तर आभार डॉ. निलेश गावडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सुनील चौधरे, डॉ.निलेश गावडे, डॉ.पंकज गावित व क्रीडा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. निलेश गाडेकर, गजानन शिरसागर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments