ॲड श्री प्रमोद दादा जगताप यांच्या माऊली या निवासस्थानी बिपिनदादा कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वैजापूर प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय ॲड. श्री. प्रमोददादा जगताप यांच्या 'माऊली' निवासस्थानी कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. आदरणीय श्री. बिपिनदादा कोल्हे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मराठा शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकचे अध्यक्ष मा. श्री. प्रणवदादा पवार, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी मा. अमितदादा कोल्हे हेही आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा. शाखा अधिकारी श्री. संभाजीराव तात्या जगताप, ॲड श्री कैलास राव गवारे श्रीरामपूर,ॲड. श्री. नानासाहेब जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना नेते श्री. कल्याणराव जगताप, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. जगताप सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी मा.श्री.बिपिनदादा कोल्हे साहेब यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments