प्रा.चंद्रकांत भोजने यांची राज्य मीडिया प्रमुखपदी निवड.



 राजुरी वार्ताहर :पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन तसेच सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे पर्यावरण प्रेमी प्रा. श्री. चंद्रकांत धोंडिबा भोजने यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राज्य मीडिया प्रमुख (महाराष्ट्र राज्य) पदावर सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.

संस्थेचे राज्याध्यक्ष मा. श्री. प्रमोददादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. ५ जून २०२६ रोजी राळेगणसिद्धी (जि. अहिल्यानगर) येथे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती संध्या गायकवाड (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) यांच्या हस्ते तसेच राज्याध्यक्ष श्री. प्रमोददादा मोरे, सचिव वनश्रीताई मोरे, ॲड. सुरेश लगड (विशेष सरकारी वकील), कार्याध्यक्षा छायाताई राजपूत, जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब डोंगरे, लतिकाताई पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. भोजने यांनी पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून जनजागृती, वृक्षारोपण मोहिमा तसेच शालेय व सामाजिक स्तरावर पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

प्रा. भोजने यांच्या निवडीबद्दल राज्य कोअर कमिटीतील पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी राज्य कोअर कमिटीतील प्रमुख सदस्यांमध्ये श्री. बाळासाहेब डोंगरे, डॉ. दादासाहेब जवरे, प्रा. महेश पाडेकर, श्री. संजय गायकवाड, डॉ. नानासाहेब गोफणे, श्री. राजकुमार गिरी, श्री. मदन राजपूत, श्री. सोपानराव वायळ, प्रा. डॉ. बबन जाधव, श्री. अनिल लोखंडे, श्री. संतोष परदेशी, प्रा. भारत उगाडे,पत्रकार श्री विजय बोडखे यांचा समावेश होता. तसेच श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, कोंढापुरी येथील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समस्त ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रा. श्री. चंद्रकांत भोजने यांच्या निवडीमुळे पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास राज्याध्यक्ष मा. श्री. प्रमोददादा मोरे यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रा. भोजने यांनी "झाडे लावा – झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन हीच खरी मानव सेवा" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments