दिलीप शिंदे
सोयगाव दि. १०-- आदिक मास महिन्याचे निमित्त तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांनी क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचालित अंजनाई गोशाळेला दि.१० बुधवारी सायंकाळी भेट देत गो मातेच पूजन केले.
यावेळी त्यांनी गो माता यांना फळ आहार खाऊ घातला.दरम्यान अंजनाई गोशाळेत तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले संस्थेच्या वतीने तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांचा संस्थेच्या कोषाध्यक्षा उर्मिला इंगळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे,सचिव दिलीप शिंदे, सहसचिव अनिल लोखंडे,कोषाध्यक्ष उर्मिला इंगळे, सदस्या पद्माबाई शिंदे, रुपाली लोखंडे, शारदा इंगळे,मीना गाडेकर,सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर,राम बोडखे, ज्ञानेश्वर जाधव,राहुल जयवळ,केतन शिंदे,अथर्व इंगळे,गौरव हिरे आदीं उपस्थित होते.संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
0 Comments