दिलीप शिंदे
सोयगाव दि.०८-- यावर्षीच्या प्रचंड उन्हाळ्यामुळे अजिंठा डोंगरातील बहुतांश नैसर्गिक जलसाठे आटले आहेत. यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी वनवणं होत आहे व जीवास धोका निर्माण झाला आहे.पाण्याच्या शोधामध्ये अनेक वन्यजीव सैरा वैरा फिरत मानवी वस्ती कडे वळत आहे व अनेक ठिकाणी मनुष्यव वन्यजीव संघर्ष उद्भवत आहे.
सिल्लोड येथील वन्यजीव संवर्धक डॉ.संतोष पाटील यांनी स्वखर्चाने आपल्या आईच्या स्मृति निमित्त या डोंगरातील पूर्वेकडील भागातील पानवट्यांमध्ये पाणी टाकून वन्यजीवांची ताण भागवण्याचे कार्य केले आहे. अगदी एक हजार रुपयांच्या खर्चात तीन ते चार पाणवठे व खाच खळग्याच्या खोलगट जागा मध्ये जलसाठा करून सात- आठ दिवस तरी वन्यजीवांची तहान शमते व निसर्ग वृद्धिंगत होण्यास हातभार लागतो हे दर्शवले आहे. पाटील यांनी आजवर पंधरा वर्षाच्या काळात आपल्या प्रियजनांच्या स्मृतीखातर सहा वेळेस जंगलातील जलसाठे भरले आहे. आपपल्या प्रियजनांच्या स्मृतिखातर असे रानावनातील पाणवठे दत्तक घ्यावे जेणेकरून अगदी कमी खर्चात वन्यजीवांची सेवा घडेल .आपले वाढदिवस,केक,फटाके,मिठाई, पार्टी इ इ.गोष्टींवर व्यर्थ खर्च न करता करता भूतदया,निसर्गसेवा करावी ज्यामुळे वन्यजीवनास हा उन्हाळा सुखदायी होईल असे आवाहन डॉ.पाटील यांनी केले आहे .
0 Comments