वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर या ग्रामीण भागातून शिक्षण व मोठी जिद्द घेऊन छत्रपती संभाजी नगरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये एक यशस्वी वाटचाल करणारे व अल्पावधीत आपले नावलौकिक वाढवणारे व्यक्तिमत्व म्हणजे किरण दादा जगताप यांचे नाव अग्रस्थानी घेता येईल.असे गौरवास्पद उद्गगार प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी काढले आहे.
नुकताच उद्योजक किरण दादा जगताप यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या गावात श्रीक्षेत्र भऊर येथे सर्व ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ह भ प संजयजी महाराज जगताप तसेच गावचे आधारस्तंभ प्रमोद दादा जगताप, बाबासाहेब भाऊ जगताप व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत किरणदादा जगताप यांचा वाढदिवसानिमित्त श्री रोकडेश्वर हनुमान मंदिराच्या सभागृहात सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना हभप संजयजी महाराज जगताप यांनी म्हटले की,
छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रातील एक यशस्वी व प्रेरणादायी उद्योजक म्हणून किरण जगताप सर्वपरिचित आहेत. Cast 4 Aluminium Company, शेंद्रा MIDC चे ते संस्थापक व कंपनी मालक म्हणून त्यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. तसेच सन २०२२-२३ मध्ये MASSIA चे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली होती, हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे आणि उद्योग क्षेत्रातील विश्वासार्हतेचे द्योतक आहे. असे यावेळी हभप संजयजी जगताप महाराजांनी म्हटले. तर प्रमोद दादा जगताप यांनीही किरण दादा जगताप यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी उद्योजक किरण जगताप यांना आपल्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि यशस्वी भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.व आपल्या हातून असेच उद्योग, सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात व युवा वर्गात असेच प्रेरणादायी कार्य घडत राहो. अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी किरण भाऊ जगताप यांनी सांगितले की, आपल्या गावातील हा माझा वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला सत्कार नक्कीच मला पुढील जीवनासाठी व माझ्या सर्व क्षेत्रातील कार्यासाठी प्रेरणादायी ठरत राहील तसेच गावचे प्रेमही आणखी त्यामुळे द्विगुणीत होत राहील.असे यावेळी त्यांनी सांगत आपला सत्कार केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे त्यांनी यावेळी धन्यवाद मानले.
0 Comments