टाकळीभान प्रतिनिधी -अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्थेच्या वतीने लोहार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, उद्योग व्यवसाय व राजकीय विकासासाठी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाकडे निवेदने, पत्रव्यवहार आणि मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. मात्र, आजपर्यंत शासनाकडून या मागण्यांची अपेक्षित दखल घेण्यात आलेली नाही.
समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही शासन उदासीन राहिल्यास आगामी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुंबईच्या आझाद मैदानावर लोहार समाजाचा व्यापक लोकशाही मार्गाने एल्गार पाहायला मिळेल, असा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
लोहार समाजाला न्याय, प्रतिनिधित्व आणि विकासाच्या संधी मिळाव्यात, हीच आमची भूमिका असून शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
त्यातील काही महत्वाचे मुद्दे व विषय.....
1)महाराष्टतील नागरी स्थानिक संस्था महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये झालेल्या निवडणुकानंन्तर पक्षातर्फे लोहार समाज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची स्वीकृत सदस्य, प्रतिनिधी व नगरसेवक म्हणून निवड करुंन नेमणूक करणेबाबत
2)लोहार समाज बांधव यांची विधानपरिषदेवर स्वीकृत आमदार म्हणून नेमणूक करण्याबाबत
3)भटक्या जमाती व विमुक्त जातीसाठी(एन टी प्रवर्ग)अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्युच्या प्रकरणातील दिवगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास नोकरी देणे व मिळणेबाबत.
4)लोहार समाज्यास मिळालेले ब्रह्मलीन आचार्य दिव्यांद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करणे, राज्य व जिल्हास्तरीय प्रतिनिधी निवड, 500कोटी निधी उपलब्ध करणेबाबत
5)आमच्या लोहार समाज्यातील शूरवीर, योद्धे, कारागीर व युगपुरुष यांनी ऐतिहासिक, शिवसम्राज्यात, स्वराज्यासाठी शस्त्र निर्मिती हत्यारे बनवून दिली, योगदान दिले त्यांची शासन दरबारीं ऐतिहासिक नोंद व्हावी, त्यांचे इतिहास, कागदपत्रे प्रकाशित व्हावीत व त्यांच्या कर्मभूमीत त्यांचे राष्ट्रीय स्मारक बनविणे बाबत.
6)आमच्या लोहार समाज्यास एस सी व एस टी समाज्याप्रमाणे शासकीय योजना, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक व परीक्षा शुल्क, आरक्षण व वैधता मध्ये पात्र ठरण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्नाची अट व मर्यादा नसणेबाबत.
7)महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लोहार समाज्याच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय व पारंपरिक लोहार व्यवसाय विकासाच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याबाबतचे निवेदन पत्र बाबत.
8)लोहार समाज बांधव भगिनींना जातीचा दाखला काढतांना 1965 चा अगोदरचा पुरावा मागतात, तर ती जाचक अट रद्द करणेबाबत
9)आमच्या लोहार समाज्यातील कारागीर व उद्योजकाना मशनरी एकुयपमेंट टेस्टिंग सेंटर ऑफ कॉलेज ऍग्रीक्लचर चे टेस्टिंग सर्टिफिकेट रिपोर्ट नॉमिनल शुल्क, अल्पदराने वा सवलतीच्या दराने मिळणेबाबत.
10)आमच्या लोहार समाज बांधव भगिनींना म्हाडा गृहनिर्माण संस्थेत आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढवून मिळणेबाबत
11)लोहार समाज बांधव भगिनींना शासकीय कौशल्य विकास योजनाचा लाभ मिळणेबाबत
12)जन्माने व रक्ताने लोहार असलेले, पण व्यवसाय व नजरचुकीने सुतार पाटील इतर नाव लागलेले,वाढी वाढई बांधव भगिनीचा भटक्या जमाती मध्ये समावेश करणेबाबत.
13)केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांचेकडून होणारी जातनिहाय भटक्या व विमुक्त जाती जमातीची जनगणना ही स्वतंत्ररित्या करणेबाबत
14)महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर जास्तीस जास्त 75% टक्के पर्यंत सबसिडी लोहार समाज बांधव भगिनींना मिळणेबाबत
अश्या अनेक समाजहिताच्या मुद्दे व विषयावर प्रलंबित मागण्याचा पत्रव्यवहार व पाठपुरावा चालू आहे.
संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची शासनाने योग्य दखल घेऊन संबंधित विभागाना आवश्यक ते निर्देश देऊन,आम्हास योग्य न्याय द्यावा. ही नम्र विनंती.
अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था पुणे
अध्यक्ष श्री कुमारभाऊ थोरात
कार्यवाह श्री दिलीप वसव लोहार
लोह क्रांती – एक विचारधारा सामाजिक चळवळ
संस्थापक : श्री संजय भाऊ कोळंबेकर
0 Comments