पहिल्याच दिवशी वरिष्ठ अधिकारी भेटी देणार , शाळा प्रवेशोत्सव पूर्व तयारी बाबत शिक्षण विभाग अलर्ट___



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१४-- सोयगाव तालुक्यात १५ जून सोमवार पासून शाळा सुरू होतील. त्यामुळे आपल्या संपूर्ण शाळांचा परिसर स्वच्छ करून घ्यावा, विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात नियमांचे पालन करावे. शाळेच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

 पावसाळ्यात विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम शालेयस्तरावर राबवावे, शासनाकडून मिळणारे लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत, अशा सूचना गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे यांनी तालुक्यातील मुख्याध्यापकांना दिल्या.सोमवार पासून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत आहे त्यासाठी तहसीलदार मनीषा मेने,गटविकास अधिकारी अमोल जगताप, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे आदींसह मंडळ अधिकारी, तलाठी,ग्रामपंचायत अधिकारी,विस्तार अधिकारी आदी कर्मचारी शाळेला भेटी देऊन प्रवेशोत्सवाचा अहवाल सादर करणार आहेत असे सहायक गटविकास अधिकारी अशोक दौड यांनी सांगितले.. 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत सर्व शाळांनी सहभागी होऊन त्याची नोंद 'अमृतवृक्ष ॲप' मध्ये करावी व उपक्रम यशस्वी करावा.अशा सूचनाही तहसीलदार मनीषा मेने यांनी दिल्या आहेत..

Post a Comment

0 Comments