सोयगाव तालुक्यातील घोसला गावातील पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने निधन, घोसला गावात हळहळ---



दिलीप शिंदे
सोयगाव दि.१४--सोयगाव तालुक्यातील घोसला ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा कर्मचारी अनिल बाबूलाल तडवी(वय- ५४) यांचे पाणी पुरवठा कर्तव्यावर असताना अचानक हृदय विकाराने निधन झाल्याची घटना दि.१४ रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. त्यांना तातडीने पिंपळगाव (हरे) ता.पाचोरा येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे घोसला गावात शोककळा पसरली आहे रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली,एक भाऊ,सुना नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान दिवस भर पाणी पुरवठा करणारे अनिल तडवी यांचे अचानक सायंकाळी निधन झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ पसरली असून या घटनेमुळे शोककळा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments