ॲड. रावसाहेब शिंदे जीवनगौरव पुरस्कार सर्वश्रेष्ठ: डॉ. ज्ञानदेव म्हस्के*

प्रा.शरद दुधाट

श्रीरामपूर : श्रीरामपूरमध्ये असताना ॲड.रावसाहेब शिंदे यांच्या छत्रछायेखाली आणि श्रीरामपूरकरांच्या स्नेहभाव आणि सौख्यातून जीवन सुसंस्कारित झाले. श्रीरामपूरातील महादेव मळा या तीर्थस्थानी ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे, असे मत सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. 

श्रीरामपूर येथील महादेव मळ्यात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्यावतीने नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे व्हॉ. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे हे होते तर अध्यक्ष रयतचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, माजी प्राचार्य टी.ई.शेळके, माजी प्राचार्य डॉ. एकनाथराव ढोणे, डॉ. राजीव शिंदे, डॉ. बाबुराव उपाध्ये, संस्थापक सचिव सुखदेव सुकळे हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ॲड. रावसाहेब शिंदे व ज्ञानतपस्वी डॉ. रत्नाकर मंचरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मंगलताई आढाव, डॉ. प्रेरणा शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुखदेव सुकळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. यावेळी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्यावतीने प्रमुख पाहुण्यांच्या सन्मानासह कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचा स्व. ॲड. रावसाहेब शिंदे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२६ तर माजी प्राचार्य डॉ. एकनाथराव ढोणे यांचा ज्ञानतपस्वी डॉ. रत्नाकर मंचरकर राज्यस्तरीय शिक्षणरत्न साहित्य पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. तर कवयित्री डॉ. संगीता फासाटे (कटारे) यांचा पीएच.डी प्राप्तीबद्दल सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ॲड.भगीरथ शिंदे, डॉ. एकनाथ ढोणे, डॉ. राजीव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दुर्गाताई तांबे, डॉ. शंकरराव गागरे, डॉ. दीनानाथ पाटील, काशिनाथ गोराणे, प्रकाश निकम पाटील, उद्धव टेमकर, पद्माकर शिंपी, ॲड. भागचंद चुडीवाल, डॉ. दिलीप पडघन, डॉ. सिंधुताई पडघन, डॉ. भास्कर निफाडे, डॉ. रमेश भालेराव, सुभाष गायकवाड, कुणाल बनकर, डॉ. गोरख बारहाते, मोहनशेठ कुकरेजा, डॉ. सुनील चोळके, डॉ. बाळासाहेब बावके, भाऊसाहेब पेटकर, डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. बखळे आदीजण उपस्थित होते. डॉ. म्हस्के यांनी आपल्या मनोगतातून ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल धन्यता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी केले. तर डॉ. शरद दुधाट यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments