अधिक मासानिमित्त भालगाव ता. वैजापूर येथे हभप उद्धवजी महाराज मंडलिक, श्री कैलास गिरीजी महाराज व श्री संजयजी महाराज जगताप यांच्या उपस्थितीत संत पूजन, संत दर्शन व संत भोजन असा आध्यात्मिक होणार संगम!भाविकांनी लाभ घ्यावा- -आयोजक- गावंदे परिवार

शिर्डी (प्रतिनिधी)-अधिक महिना हा अध्यात्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात देवदर्शन, संतदर्शन तसेच विविध अध्यात्मिक असे कार्यक्रम केले जात असून अशा या अधिक मासाचे औचित्य साधून या महिन्याच्या शेवटच्या दिवशी रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता वांजरगाव -भालगाव रोड भालगाव ,तालुका वैजापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गावंदे पाटील वस्तीवर संत पूजन व संत भोजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 असा हा धार्मिक दृष्टीने ऐतिहासिक संत पूजन व संत भोजन, संत दर्शन असा आध्यात्मिक संगम येथे होणार आहे. या संत पूजन व संत दर्शन व संत भोजन सोहळ्यासाठी प्रमुख संत म्हणून मठाधिपती सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रम, नेवासा येथील महंत रामायणाचार्य ह भ प उद्धवजी महाराज मंडलिक ,नेवासेकर, तसेच गिरीआश्रम , सायखेडा तालुका गंगापूर येथील ह भ प महंत श्री कैलासगिरीजी महाराज, व श्रीक्षेत्र भऊर ,तालुका वैजापूर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप यांची मंगलमय उपस्थिती राहणार आहे.
 त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला संत ,महंत, वारकरी संप्रदायातील व्यक्तींचा यावेळी श्री सुभाषराव गांवदे पाटील व परिवार यांच्या वतीने अधिक मासाचे औचित्य साधून संत पूजन ,संत दर्शन, व संत भोजन सोहळा 14 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता गावंदे पाटील वस्ती, वांजरगाव- भालगाव रोड, भालगाव ,तालुका वैजापूर येथे सरला बेटा नजीकच संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्याला तसेच संत पूजन संत दर्शन व संत भोजनाचा अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी लाभ घ्यावा. असे आवाहन सुभाषराव गावंदे पाटील व परिवारातर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments