दिलीप शिंदे
सोयगाव दि.२०--मोहरम च्या पार्श्वभूमीवर दि.२० शनिवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास शहरातील विविध भागात सोयगाव पोलिसांनी रूट मार्च केला यावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक दिनकर गोरे,यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गजानन आरेकर यांनी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिलें दरम्यान रात्री साडे सात वाजता सुरु झालेला शहरातील रूट मार्च विविध भागातून रात्री साडे आठ वाजेपर्यंत सुरु होता पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी सोयगाव पोलिसांना दंगल नियंत्रण, याव्यतिरिक्त नवनवीन प्रशिक्षण दिले शहरात काही ठिकाणी दंगा कावूचे प्रात्यक्षिक ही करण्यात आले.
यावेळी गजानन दांडगे, अजय कोळी,संजय सिंगल, संदीप सुसर,शांताराम सपकाळ यांचेसह गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते..
0 Comments