त्र्यंबकेश्वरच्या नीलपर्वतावर संतसमागम, सद्गुरुकृपा आणि दैवीयोगाचा झालेला संगम हा आध्यात्मिक जीवनातील अविस्मरणीय क्षण-- मंहत आत्मारामगिरीजी महारांज

शिर्डी ( प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथे प. पू.हरीगिरीजी महाराज व अनेक साधू महंत स्वामींची भेट व अध्यात्मिक चर्चा आणि जगप्रसिद्ध संत, परमपूज्य स्वामी आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर गादीचे पवित्र दर्शन घेण्याचा लाभ नुकताच प्राप्त झाला. 

या पवित्र स्थळाच्या दर्शनाने व भेटीने मन कृतार्थ झाले आणि गुरु-परंपरेबद्दलची श्रद्धा अधिक दृढ झाली.नीलपर्वतावर घडलेला हा संतसमागम, सद्गुरुकृपा आणि दैवी योगाचा संगम असून, हा दिवस माझ्या आध्यात्मिक जीवनातील अविस्मरणीय व आनंदी क्षण मी विसरू शकत नाही. असे मत महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की,त्र्यंबकेश्वर येथे नील पर्वत येथे संतसमागमाचा दैवी योग नुकताच आला.
श्री पंचदशनाम जुना आखाडा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री परम पूज्य हरी गिरीजी महाराज हे सनातन धर्म, संतपरंपरा आणि अखाडा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी अखंड कार्यरत असलेले एक आदरणीय संत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अखाडा परंपरेचे कार्य देश-विदेशात प्रभावीपणे पुढे जात आहे.असे ते म्हणाले.
 नीलपर्वत, त्र्यंबकेश्वर या पवित्र स्थळी नुकतीच संन्यासी आत्मारामगिरी महाराज व‌ परमपूज्य स्वामी हरिगिरी महाराज यांची सदिच्छा भेट होण्याचा दैवी योग जुळून आला. या प्रसंगी मनोहर बिडवे महाराज, योगेश पाचोरे तसेच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या कार्याला समर्पित असलेले सुहास निर्मळ उपस्थित होते. पूज्य साध्वी माताजी शारदानंद गिरीजी महाराज यांचीही स्नेहपूर्ण भेट झाली. 
यावेळी आत्माराम गिरीजी महाराज म्हणाले की,या भेटीत संतांच्या सान्निध्यात धर्म, अध्यात्म आणि समाजसेवा याविषयी प्रेरणादायी संवाद साधता आला.तसेच जगप्रसिद्ध संत, परमपूज्य स्वामी आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर गादीचे पवित्र दर्शन घेण्याचा लाभ प्राप्त झाला. या पवित्र स्थळाच्या दर्शनाने मन कृतार्थ झाले आणि गुरु-परंपरेबद्दलची श्रद्धा अधिक दृढ झाल्याचे मत जुना आखाड्याचे व श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत, संन्याशी मंहत आत्मारामगिरीजी महारांजानी सांगितले.

Post a Comment

0 Comments