टाकळीभान येथेअज्ञात ट्रकच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू



टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील हॉटेल साई गायत्री व राज्यमार्ग 50 या रस्त्यावर अज्ञात ट्रकच्या वाहनांच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू 

           सध्या या महिन्यात उन्हाची मोठी तीव्रता असून पाऊस न पडल्यामुळे हिंस्र प्राणी पाण्यासाठी व आपल्या भक्षणासाठी इतरत्र भटकत असताना शुक्रवार दि. 12 जून ८:३० सायंकाळी वाजता बिबट्या रोड ओलडताना अचानक दिशा चुकल्याने बिबट्याला आपला जीव गमावा लागला याची माहिती तात्काळ फॉरेस्ट अधिकाऱ्यांना समजतात फॉरेस्ट अधिकारी आयुष्मान बढे घटनास्थळी दाखल होऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी श्रीरामपूरला रवाना करण्यात आले. बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments