हनुमंतगावचा‌ श्री. ज्ञानेश्वर अहिरे चषक पाथरे बु या संघाने‌ जिंकला

लोहगाव (वार्ताहर )

राहाता तालुक्यातील बहुचर्चित हनुमंतगावचा श्री.ज्ञानेश्वर अहिरे चषक पाथरे बुद्रुक या संघाने जिंकला.
        हनुमंतगाव क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ यांच्या सौजन्याने श्री. ज्ञानेश्वर अहिरे क्रिकेट चषक भरवण्यात आला होता. प्रशस्त ग्राउंड मध्ये गेल्या सहा दिवसापासून ह्या क्रिकेटच्या मॅचेस सुरू होत्या. यामध्ये अनेक क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता कडाक्याच्या उन्हात परिसरातील क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या क्रिकेट सामन्यामुळे हनुमंतगावचे वातावरण पूर्णपणे क्रिकेटमय झाले होते. गावातील नागरिकांनी हे सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उत्कृष्ट नियोजन व विपक्षपाती पंचगिरी यामुळे खेळामध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. क्रिकेट पाहण्यासाठी महिलाही मैदानावर उपस्थित होत्या. कोणतेही गालबोट न लागता ही स्पर्धा पार पडली. शेवटच्या साखळी सामन्यांमध्ये लढती आणखी रंगतदार झाल्या त्यामुळे या सामन्याचा पुरेपूर आनंद गावकऱ्यांनी घेतला. श्री ज्ञानेश्वर अहिरे चषकातील तिसरे ३३३३ रुपयांचे पारितोषिक वाकडी संघाने पटकावले तर दुसरे ५५५५ रुपयांच्या पारितोषिकावर नाव कोरण्यात हनुमंतगाव संघ यशस्वी झाला. सर्वात जास्त मने जिंकली ती पाथरे बुद्रुक संघाने पहिल्या सामन्यापासून जोरदार खेळाचे प्रदर्शन करून या संघाने विजयाची घोडदौड सुरूच ठेवली होती उत्कृष्ट गोलंदाजी व आक्रमक फलंदाजी तसेच नियोजनबद्ध क्षेत्ररक्षण याच्या जोरावर पाथरे बुद्रुक संघाने विजय खेचून आणला व १११११ रुपयांच्या बक्षीसाचा मानकरी ठरला. यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांनी आपली मते मांडताना श्री. ज्ञानेश्वर अहिरे भरवणाऱ्या आयोजकांचे तोंड भरून कौतुक केले व अशा स्पर्धा हनुमंतगाव मध्ये कायम भरवल्या गेल्या पाहिजे अशी इच्छा बोलून दाखवली. एकलव्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या हस्ते विजयी संघांना विजयी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले व विजयाची रक्कम देण्यात आली. यावेळी पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक अशोक घोलप, शिक्षक संजय अनाप, सचिन पवार,दीपक घोलप, भाऊसाहेब आव्हाड, शब्बीर शेख, योगेश्वर तुंबारे, भारत जाधव, विकास अनाप, कामिनी डिंबर, विजय तुंबारे, प्रसाद ब्राह्मणे, रवींद्र पर्वत, बाळासाहेब पाबळे, सोमनाथ जेजुरकर, चंद्रकांत घोलप, मोहन पंडोरे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments