राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील कन्या विभागाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल यंदा ९४.७३ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या उज्ज्वल निकालामुळे शैक्षणिक संकुलाच्या गुणवत्तेची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या परीक्षेत कु. संचिता अनिल मेटे हिने 91.80टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. प्रांजल नितीन पंडित हिने88 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला असून कु. हर्षदा राजेंद्र टाचतोडे हिने 87.20 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यार्थिनींच्या या यशामुळे पालक व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के पाटील, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, प्राचार्य विनायक मेथडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments