दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी :-गोदाकाठावरील वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शनी देवगाव येथील शनैश्वर देवस्थानात शनैश्वर जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १४ ते शनिवार, दि. १६ मे दरम्यान त्रिदिवसीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, हरिशरण महाराज, संदीपान महाराज आणि योगेंद्रगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनैश्वर देवस्थान, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतीलभाविकांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होणार आहे.
या सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ, सायंकाळी ६ ते ८ किर्तन, त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले
आहे. गुरुवार, दि. १४ मे रोजी स्वामी विश्वनाथगिरी महाराज (चोरवाघलगाव) यांचे, तर शुक्रवार, दि. १५ मे रोजी स्वामी अर्जुनगिरी महाराज (शिंगी) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. शनिवार, दि. १६ मे रोजी वैशाख अमावस्या तथा शनैश्वर जयंतीदिनी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने त्रिदिवसीय उत्सवाची सांगता होणार आहे.या धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments