टाकळीभान प्रतिनिधी-
 श्रीरामपूरतालूक्यातीलबेलापुर,दत्तनगर,पढेगाव,अशोकनगर व शिरसगाव येथील शिधापत्रिका असून धान्य मिळत नसलेल्या एकल महिलांच्या प्रश्ना संदर्भात आज तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात भेट दिली असता या विभागातील प्रमुखांचा एकल महिलांबाबत असंवेदनशीलपणा समोर आला आहेत,
    गेल्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महिलांची नावे द्या म्हणणारे अधिकारी विविध कारणे देत आपली जबाबदारी झटकताना दिसले गेली दिड-दोन वर्षांपासून अनुसूचित जमातीतील एकल महिला वैशाली सोनवणे यांना शिधापत्रिका असून धान्य मिळत नसल्याने पुरवठा विभागात वेळोवेळी चकरा मारून अन्नसुरक्षा योजनेचे कागदपत्र जमा करणेस गेले असता या विभागाने ते कागदपत्र स्वीकारले नाहीत यामुळे त्या आजपर्यंत अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहिल्या या व अशा काही एकल महिलांच्या नावाची यादी आज पुरवठा विभागात सादर करण्याचा प्रयत्न केला असता संबधित अधिकारी यांनी लाभ सुरू करण्या ऐवजी विविध प्रश्न उपस्थित केले एकल महिलांच्या २५ योजनांपैकी २ महत्वाच्या गणल्या गेलेल्या संजय गांधी निराधार योजना व शिधापत्रिकेवरील अन्नधान्य योजना याबाबत सरकार संवेदनशील असताना संबधित विभागातील अधिकारी नाकर्तेपणाची भुमिका घेताना दिसतात व या एकल महिला भगीनींना लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न यातून दिसून येत आहे झालेल्या प्रकाराबाबत मिशन वात्सल्य शासकिय समितीचे अशासकिय सदस्य बाळासाहेब जपे यांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली..