आगर व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या बरोबर सकारात्मक बैठक संपन्न
संगमनेर बस स्थानक हे मध्यवर्ती व भव्य असून या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.प्रवाशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यांचे निर्मूलन करणे कामी विविध प्रश्नासंदर्भात आगर व्यवस्थापक प्रशांत गुंड यांचे समवेत नुकतीच संगमनेर तालुका प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होऊन निवेदन देण्यात आले.
निवेदनात, नवीन व आधुनिक (ई - व्हि / लग्झरी ) बसेसची उपलब्धता करण्यात यावी, संगमनेरात एस.टी.स्मार्ट कार्ड साठी शासनाने निश्चित केलेली शुल्क आकारणी करावी, खेड्यापाड्यातून येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या वेळेचे गांभीर्य लक्षात घेता संगमनेर बस स्थानक ते अमृतवाहिनी कॉलेज शटल बस सुरू करावी, बस स्थानकात पार्किंग स्टँड सुरू करावे, स्थानिक पोलिस चौकी चोवीस तास कार्यान्वित असावी,प्रवाशांच्या तक्रारी साठी सूचना पेटी असावी आदी विषयासंदर्भात आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा होऊन काही प्रश्नांबाबत सूचना करून अंमलबजावणी करण्यात आली तर काही प्रश्न प्रक्रियेमध्ये असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस, संगमनेर तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष - अनिल भोसले, उपाध्यक्ष - संजय क्षत्रिय, सचिव - नितीन मोहोळे, खजिनदार - मुरतजा बोहरी, प्रसिद्धी प्रमुख - लहानु सदगीर,विवेक मुळे,सुरेश डग, सचिन गणोरे,विनोद गायकवाड, बंटी यादव,शांताराम आडेप, दिलीप गायकवाड, बी. के. गायकवाड, एजाज शेख, शशीभाऊ पगारे, रवींद्र नवले, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.
0 Comments