दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९-- जिल्हा परिषद प्रशाला सोयगांव येथील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातून एकूण १२४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९९ विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेचा एकूण निकाल ७९.८३ % इतका लागला आहे. यामध्ये १६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर ४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत , ३७ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत , ०३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रथम - प्रियंका रवींद्र जाधव (८८.२०),व्दितीय - आरती कडुबा ढगे (८५.६०),
तृतीय - आकांक्षा राहूल बोराडे (८३.४०),चतुर्थ - अक्षरा रमेश गायकवाड (८३.२०),पाचवी - इश्वरी सुनील मोरे (८१.६०) तर
सहावा क्रमांक वृषाली गोपाल गारखेडे (८०.६०) उत्तीर्ण झाले.
प्रशालेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक दादाराव राठोड, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, केंद्रप्रमुख एफ.एस.तडवी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील ठोंबरे , माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी तुकाराम तायडे , माजी गटशिक्षणाधिकारी गिरीश जगताप,अरुण सोहनी,संजय शहापूरकर,राजेंद्र दुतोंडे ,निलेश गाडेकर,दिलीप रावने, सर्व शिक्षकवृंद सुकदेव पाटील, शिवाजी नवले,दौलतसिंग परदेशी,भास्कर चौधरी,विद्याधर बागुल,राजेंद्र उंबरकर,संतोष भारद्वाज,संगीता सोनवणे,जय वाघ,तुकाराम पायघन,वैजनाथ सावळे,सुनील शेटे ,सचिन ढगे,सीमा राऊत,शिवराम आगे यांच्या सह सर्व पालक व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments