लोहगाव (वार्ताहर): महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील कन्या विद्यालयाचा निकाल ९४.७३ टक्के लागला असून विद्यालयात अनुक्रमे संचिता अनिल मेटे ९१.८० टक्के, प्रांजल नितीन पंडित ८८ टक्के व हर्षदा राजेंद्र टाचतोडे ८७.२० टक्के गुण मिळवून अध्यक्ष प्रथम तीन आल्या आहेत.
मुले विभागाचा निकाल ८४.७८ टक्के लागला असून आदित्य संतोष घंगाळे ८८.६० टक्के, कार्तिक जनार्दन तागड ८३.८० टक्के तर साई संतोष पवार ८२.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के पाटील, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे पाटील व प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, माधुरी वडघुले, संजय ठाकरे, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments