कै. बाबुरावजी काळे मराठी स्कूलची विद्यार्थीनी मृणाल मानकर सोयगाव केंद्रातून ९१:४० गुण मिळवून प्रथम --



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०८ -- कै. बाबूरावजी काळे मराठी स्कूलची विद्यार्थीनी मृणाल गणेश मानकर हिने माध्यमिक परीक्षेत ९१:४०% गुण मिळवून सोयगाव केंद्रातून व शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूलचे मुख्याध्यापक निलेश पाटील,शिक्षक ज्ञानेश्वर एलिस,योगेश काळे,रुपाली मानकर आदींसह शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली मृणाल  हे यश संपादन केले. 

या यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे, सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे, अमोल निकम, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, ज्ञानेश्वर गाडेकर,अनिल लोखंडे,शाम पाटील, दत्तू रोकडे, राम सोहनी,महेश मानकर, ईश्वर इंगळे,अशोक ढगे,दिलीप सुरडकर, दीपक पाटील,राहुल सोनवणे, अनिल चौधरी,तुकाराम सोनवणे आदींनी मृणाल मानकर चे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments