राजुरी (वार्ताहर ) विजय बोडखे
राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील सरपंच उपसरपंच व गावातील मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला.
प्रवरा परिसरातील प्राणीमित्र विकास म्हस्के यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाने वनविभागात मानद वन्यजीव रक्षक या पदावर नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीने परिसरात एक मानाचा तुरा रोवला गेला. विकास म्हस्के यांच्या नियुक्तीने प्रथमच प्रवरा परिसराला व जिल्ह्याच्या उत्तर भागाला संधी मिळाली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री डॉ राधाकृष्ण विखेपाटील यांनी विशेष लक्ष घालून प्राणिमित्रांना न्याय दिला.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील मानद वन्यजीव रक्षक पदाच्या नियुक्ती रखडल्या होत्या.
या वेळी पाथरे बुद्रुक येथील सरपंच उमेश घोलप सर, उपसरपंच आरिफ शेख, प्र.रु.ए.सोसायटीचे संचालक आबासाहेब घोलप पाटील, दिलीपराव घोलप सर, सयाजी कडू पाटील, बाळासाहेब कडू पाटील, भास्करराव घोलप पाटील,ताराचंद कडू पाटील, कैलास घोलप पाटील, सुरेश घोलप पाटील, बबन कडू पाटील, मुन्नाभाई , भाऊसाहेब शिंदे पाटील, शिवाजी घोलप पाटील, गंगाधर कडू पाटील, बाळासाहेब घोलप पाटील, प्रविण घोलप पाटील, संतोष घोलप पाटील दत्तात्रय कडू पाटील, राजेंद्र कडू पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी स्वप्निल कडु यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, व कृष्णा उमाकांत कडु याने दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल, व रिया शेख हिने बारावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले बद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी दिलीप घोलप सर यांनी प्रास्ताविक केले व सयाजी कडू यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments