जय संघर्ष ग्रुप चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण वाघ यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार जाहीर ---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१४-- सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील प्रविण वाघ यांच्या सामाजिक कार्यात दखल घेत पुणे येथील राष्ट्रभक्ती या संस्थेने त्यांना राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील गोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दि.१७ मे रोजी पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 दरम्यान प्रवीण वाघ यांना लहान पणापासूनच समाजसेवेची आवड असल्याने घरच्या गरीब परिस्थितीवर मात करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वाहन चालवतात. याच वेळी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेशी जोडले गेले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जबाबदारी सोपवली. राज्यासह इतर राज्यातील असंख्य वाहन चालक मालकांना संघर्ष ग्रुपश जोडले. वाहनचालक व मालकांनी रस्त्यावर झालेल्या वाहनाच्या अपघात समयी मदत करणे, रस्त्यावर नादुरस्त वाहनाला तत्काळ मॅकनिक उपलब्ध करून देणे, संघटनेच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे काढणे, हिट अँड रन कायदा रद्द करण्याठी त्यांनी देशातील पहिला मोर्चा काढला होता, देशात अपघात कमी करण्यासाठी गोंदेगाव येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीचे नियम प्रशिक्षण शिबिर आयोजित करून हजारो विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांविषयी माहिती देणे, वाढदिवसानिमित्त गोंदेगाव येथे स्मशान भूमी व जि,प,शाळेत मध्ये वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन केले, शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांत बक्षीस वाटप करणे, निवडणूक मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वात अगोदर मतदान करणाऱ्या मतदार राजाचे वृक्ष देऊन स्वागत करणे, गावातील सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी गोंदेगाव गावातील विजेच्या प्रश्नासाठी स्वाक्षरी मोहीम राबून विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करणे, मराठवाडा व खान्देश ला जोडणारा घाटनांद्रा घाट सुरळीत सुरू राहावा यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत आदर्श समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्टभक्ती परीवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील गोरे (विजेता मिडिया पुणे) यांच्या आयोजनाने उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दि.१७ मे रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम पुणे येथे पार पडणार आहॆ. प्रवीण वाघ यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जय संघर्ष ग्रुपचे तालुकाध्यक्ष अमोल निकम, सुनील निकम, दत्तू सोनवणे,अविनाश देसाई,तुकाराम सोनवणे,शाम पाटील, भगवान कोथलकर,अक्षय गव्हाणे,राजू बडक, अभय कोटेजा,शेख अख्तर,दिनेश चौधरी, बंडू झवर, संदीप दुतोंडे, गोलू चौधरी, बापू वाघ, शेख शफीक आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments