टाकळीभान: हिंदू धर्म, धर्म रक्षक छत्रपती संभाजी राजांमुळे टिकला असून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याचे उद्गार ह भ प विश्वनाथ गिरी महाराज यांनी काढले. टाकळीभान बस स्थानक परिसरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीराजांमुळे हिंदूधर्म टिकला... विश्वनाथ गिरी महाराजयावेळी महाराज उपस्थित यांना उपदेश करताना बोलत होते. यावेळी कार्यक्रम प्रसंगी ह भ प विश्वनाथ गिरीजी महाराज ( माहीम भट आश्रम घोगरगाव ) व ह भ प कृष्ण महाराज वाघुले यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व त्यानंतर उपस्थित महाराज व गावातील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराजांची आरती संपन्न झाली. सायंकाळी पारंपारिक वाद्यासह, व बाल वारकरी विद्यार्थी, टाळकरी भजनी मंडळी यांसह छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार, सोसायटीचे चेअरमन मंजाबापू थोरात, कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, सोसायटीचे माजी चेअरमन राहुल पटारे, विलास दाभाडे, प्राचार्य जयकर मगर, ॲड प्रमोद वलटे, तंटामुक्तीचे आबासाहेब रणनवरे,बंडोपंत बोडखे, अनिल बोडखे, अक्षय कोकणे, संभाजी पटारे, रणजीत मगर,बापूसाहेब शिंदे, सुधीर मगर, मेजर राहुल तांदळे, नरेंद्र अबुज, किशोर माने, प्रताप परदेशी, विक्रांत माने, केतन शिंदे,संदीप कोकणे, विलास बोडखे, मनोज मगर, गौरव चितळे, बबलू परदेशी, आदीसह छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे सदस्य, राजमुद्रा ग्रुपचे सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments