सावळीविहीर येथे पंधरा दिवसापासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये जेरबंद! वनविभागाच्या प्रयत्नाला यश!अजूनही दोन ते तीन बिबटे परिसरात असण्याची शक्यता!

शिर्डी ( राजकुमार गडकरी)-
गेल्या पंधरा दिवसापासून सावळीविहीरच्या कारवाडी भागामध्ये धुमाकूळ घालणारा एक बिबट्या रात्री पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे.
 गेल्या पंधरा दिवसापासून सावळविहीर येथील कारवाडी भागामध्ये बिबट्यांचा वावर होता.
 अनेकांनी बिबट्यांना पाहिले होते. सरपंच ओमेश जपे यांच्या वस्तीच्या पाठीमागे आठ दिवसापूर्वी चार बिबटे कॅमेरातही कैद झाले होते. तसेच नितीन जपे यांच्या वस्तीजवळही नाईट विजन ड्रोन कॅमेरात बिबटे दिसून आले होते. काल शनिवारी एका शंकर नावाच्या तरुणावर बिबट्याने मोटरसायकलवर हल्ला केला होता. या तरुणाच्या पायाला जखमा झाल्या आहेत. या बिबट्यांनी या परिसरातील कुत्रे फस्त केले आहेत. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 
ठीक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. रात्रीही कोपरगाव येथील वन क्षेत्रपाल शेख साहेब तसेच साखरे ,जाधव, या वन कर्मचाऱ्यांनी नाईट विजन ड्रोन कॅमेरे यांच्याद्वारे या परिसरात बिबट्या कोणत्या भागात आहे याची पाहणी केली होती. ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसून येत होता. तेथे परिसरात पिंजरे लावण्यात आले होते. अखेर रात्री किशोर जपे यांच्या डाळिंबाच्या बागाजवळ असणाऱ्या एका पिंजऱ्यामध्ये बिबट्या सावज पकडण्याच्या नादामध्ये जेरबंद झाला आहे. वनविभाग तसेच कट्टा गॅंग, ग्रामस्थ, यांनीही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले.मा. जि.प. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील व मा.खा. डॉ. सुजय विखे पा. यांनीही येथील बिबटे पकडण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले आहे. अखेर बिबट्या अनेक दिवसापासून उलकवणी देत होता. मात्र रात्री तो पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे. अजूनही या भागात बिबटे आहेत. अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे. कारण आठ दिवसांपूर्वी चार बिबटे कॅमेरात कैद झाले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे, ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे एक बिबट्या जेरबंद झाला आहे. अजूनही या भागातील इतर बिबट्यांचा संचार रोखण्यासाठी नाईट विजन कॅमेऱ्याद्वारे रात्री पाहणी करून त्या भागात पिंजरे लावून या बिबट्यांनाही जेरबंद करावे .अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments