दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९-- वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती ग्रामपंचायतीने साजरी केली नसल्याने संतप्त कंकराळा येथील ग्रामस्थानी ग्रामपंचायत समोर वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी केली. वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल घुसिंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायत कडून सर्व महापुरुषांच्या जयंती नियमितपणे साजऱ्या केल्या जातात, मात्र महाराणा प्रताप सिंह यांची जयंती ग्रामपंचायतीकडून साजरी केली जात नसल्याचा आरोप मोतीलाल घुसिंगे यांनी केला आहे.
दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत ग्रामपंचायतीकडून जयंती साजरी होण्याची वाट पाहिली. मात्र ग्रामपंचायतने जयंती साजरी केली नसल्याने युवकांनी स्वतः पुढाकार घेत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप असतानाच ग्रामपंचायत समोर महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.यावेळी युवकांनी ज्या प्रमाणे इतर महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या जातात, त्याचप्रमाणे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती देखील ग्रामपंचायतीने सन्मानपूर्वक साजरी करावी अशी मागणी केली.
0 Comments